दिनांक 8 जुलै 2022 रोजी मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे कुरुंदा व किन्होळा येथील हजारो नागरिकांचे घरांचे नुकसान झाले होते.
मा.जिल्हाधिकारी, मा.उपविभागीय अधिकारी, मा.तहसीलदार वसमत, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली वसमत तालुक्यातील २८ तलाठी, ११ ग्रामसेवक यांच्या पथका कडून संपूर्ण गावात पंचनामे, सर्वे करून सादर केले. आज प्रशासनाच्या गावातील 2992 पुरग्रस्त कुटुंबाना 1,44,6000/- रू अनुदान मंजूर झाले .असून दि.14 जुलै रोजी 1,10,45000/- रू इतकी रक्कम 2209 क्षतिग्रस्त कुटुंबाच्या बॅक खात्यावर जमा करण्यात आल्याचे तहसील कार्यालयाच्या दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. तरी उर्वरित कुटुंबाना दि.15 जुलै रोजी बॅक खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार आहेत. तसेच वसमत तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर सदृश्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अडचणीवर मात करून जनजीवन पूर्वत करण्याचे उद्देशाने तालुका प्रशासनाकडून आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत आहे तसेच तालुक्यात कुठलीही पुरसदृश्य अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास तात्काळ तालुका प्रशासनाकडे संपर्क साधावा असे आव्हान उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ तहसीलदार श्री अरविंद बोळुगे यांनी केले आहे . कुरूंदा व किन्होळा या गावातील क्षितिग्रस्त कुटुंबांसाठी वसमत तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक दिवसांचे वेतन देण्यात येऊन वेतनातून गरजूंना कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले आहे तसेच मौजे कुरुंदा येथे सतत होणाऱ्या पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी व त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंत्यांची तांत्रिक टीम तयार करण्यात आली असून दिनांक 15 जुलै रोजी सर्व हे कर्मचारी एक कुरुंदा परिसराची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधणार असल्याची माहिती तहसील कार्यालयाच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आलेली आहे.