महाराष्ट्र पोलिस बॉईज असोशिएशन चे जिल्हा अध्यक्ष मोईन कादरी यांनी राज्याच्या मुख्यमं>याना पोलीस बांधवाच्या हिताच्या व विकासा करिता जिल्हाधिकारी हिंगोली मार्फत निवेदन सादर करण्यात आले.
सदरील निवेदनात जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत कर्मचारी अधिकाऱ्यांना माणसीक ताण तणाव येऊ नये व आरोग्यविषयक अडचणी निर्माण होऊ नयेत या करिता महसुल विभागा प्रमाणे पाच दिवसाचा आठवडा करावा.
त्यांचा बेसीक व महागाई भत्ता वाढवावा. जिल्हयातील सर्व जुन्या बांधकाम असलेल्या पोलीस वसाहतीतील घरे जामिनोदोस्त करुण सर्व सुविधे सह प्रशस्त सरकारी घरे बांधुन दयावीत. सेवानिवृती नंतरचा काळात स्वःताच्या घरात समाधानी जीवन जगण्यासाठी एक टक्का व्याजाने गृहकर्ज उपलब्द करूण देण्यात यावे .
पंधरा दिवसाचे अर्जीत रजेचे रोखीकरण साहाव्या वेतन आयोगा ऐवजी सात०या आयोगा प्रमाणे दयावे.
सर्व पोलीस पाल्यांना शैक्षणीक सवलती व त्यांच्या विकासा करिता उदयोग वाढी करिता स्व. तुकाराम ओंबळे महामंडळ स्थापण करावे.
सर्व पोलीसांच्या परिवाराला सैनिका प्रमाणे लाईफ टाईम आरोग्य सुविधांचा लाभ देण्यात यावा त्यांच्या साठी स्वंतत्र रूग्णालय उभारावे.
अशाप्रकारच्या मागण्याचे निवेदन विदयमान सरकार कडे सादर करण्यात आले.