
वसमत / रामु चव्हाण
वसमत नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सिताराम मानेवार प्रभाग क्रमांक नऊ मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार असल्याचे त्यांनी सांगून प्रभागांमध्ये प्रत्येक घरावर तिरंगा फडकवणार असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले.
प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सर्व नागरिकांना राष्ट्रध्वज स्वतः सिताराम मानेवर व त्यांच्या सुविध्य पत्नी या घरोघरी जाऊन या तिरंगा अभियानाचे महत्त्व पटवून आपणही या अभियानात सहभागी व्हावं असे आव्हान करता असताना दिसून येत आहे.