ताज्या घडामोडी
कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रवादी – भाजपा शिंदे गटात लढत होण्याची शक्यता
रामु चव्हाण

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी ,भाजपा ,बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल
वसमत/ रामु चव्हाण
वसमत येथे आज कृषी उत्पन्न बाजार समिती चे निवडणुकीसाठी 46 उमेदवारांनी भरले उमेदवारी अर्ज.
वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 18 जागेसाठी विविध मतदार संघातून 5 व्या दिवशी एकूण 46 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.यामध्ये
सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघ,
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ,
हमाल मापारी मतदारसंघ,व्यापारी मतदारसंघ,या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहे.
तर आगामी निवडणूक राष्ट्रवादी आघाडी आणि भाजपा शिंदे गटामध्ये होण्याचे चिन्ह दिसून येत आहेत यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी सर्वच नेते यांनी उमेदवारी अर्ज भरताना हजेरी लावली होती तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचे अर्ज भरताना शिंदे गटांचे उमेदवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते यामुळे सरळ सरळ लढत आता राष्ट्रवादि आघाडी विरुद्ध शिंदे भाजप गटामध्ये होणार असल्याचे यावरून दिसून येत आहे.
वसमत येथे राष्ट्रवादीच्या वतीने माजी आमदार राजू भैया नवघरे यांच्या उपस्थितीत फाॅर्म दाखल करण्यात आले.यावेळी माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा ही उपस्थित होते तसेच यावेळेस अंबादास भोसले,तानाजी बेडे,दत्तरामजी इंगोले, कन्हैया बाहेती,बालुमामा ढोरे,जिजाराव हरणे, उमाकांत शिंदे ,रमेश दळवी,बाबुराव भेंडेगावकर ,प्रशांत शिंदे,त्रंबक कदम, गोरख पाटील,सचिन भोसले व इतर उमेदवार प्रतिनिधी उपस्थित होते .
तर भारतीय जनता पार्टी च्या वतीने बालाजी जाधव ,खोबराजी नरवाडे,कुमार वारे ,नाथराव कदम ,संजय काबरा त्यावेळी उपस्थित शिवदासजी बोडेवार ,सिताराम म्यानेवार,शिवाजी अलडिंगे,संजय काबरा, व इतर उपस्थित होते.
अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आसाराम गुसिंगे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डुकरे ,दुधमल यांनी दिली आहे. खालील उमेदवारांनी दाखल केले अर्ज