सह्याद्री स्कुलच्या चिमुकल्यांची राज्य पातळी पर्यंत धडक..
(५६ वी सब ज्युनिअर व ज्युनिअर महाराष्ट्र राज्य कॅरम चॅन्पियनशिप २०२२-२३ )
महाराष्ट्र कॅरम असोशियन तर्फे आयोजित वसमत तालुका व जिल्हास्तरीय कॅरम सामने जिंकून सह्याद्री स्कुल, वसमत चे विध्यार्थी खेळातील चुणूक दाखवून राज्यपातळी पर्यंत पोहचले.
अठरा वर्ष वयोगटात कु तनिष्का गड्डमवार, कार्तिक अडकीने, स्वरूप राजपुरोहित, यश राजू इंगोले,
चौदा वर्ष वायोगटात शरयू गजानन कदम, मालिनी मंडावा, शेख समी सगीर, विश्वजीत जालंधर गोडबोले, ओम सोनाजी पटवे , ऋतिक बेगाजी पटवे तसेच बारा वर्ष वयोगटात स्मिता सुभाष इंगोले ह्या सर्व विद्यार्थांची निवड झाली. पुढील राज्य पातळीचे सामने खेळण्या साठी ५६ वी सब ज्युनिअर व ज्युनिअर महाराष्ट्र राज्य कॅरम चॅन्पियनशिप हे विद्यार्थी पात्र ठरले असून, दादर मुंबई येथे ११,१२ जानेवारी ला सामने होतील. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, पंचायत समिती वसमत चे गट शिक्षणाधिकारी तानाजीराव भोसले, केंद्रप्रमुख रामराव जाधव, सह्याद्री स्कुलचे प्राचार्य जि एन कदम, प्राचार्य सुवर्णा नीळकंठे, शाळेतील शिक्षकवृंद यांनी केलें, तसेच विशेष मार्गदर्शन एम.सी.ए. मुंबई प्रमुख अरुण केदार, क्रीडा प्रशिक्षक एम ए बारी, करण चौधरी यांचे लाभले. पुढील स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा.