वसमत नांदेड रोडवर हिरोो शोरूम च्या पुढे गिरगाव येथील 22 वर्षे तरुण गणेश कैलास चंदेवार हा अपघातात जखमी झाला असता त्याला नागरिकांनी वसमत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक माहिती आहे. गणेशचा स्वभाव अतिशय हस्तमुख आणि सर्वांशी मिळून मिसळून राहणारा असल्यामुळे त्याच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
हा अपघात नेमका कशाने झाला हे मात्र कळू शकले नाही सदरील गणेश कैलास चंदेवार यास उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वसमत शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी शे.हकीम व इतर घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे या घटनेची माहिती मिळताच आमदार राजू भैया नवघरे यांच्यासह नगरसेवक शिवाजीराव आलडिंगे तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी यावेळी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.