आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
अंजानी किरवले यांना राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिलानारी पुरस्कार
रामु चव्हाण

अंजानी फाऊंडेशनचे संस्थापक बालाजी किरवले यांच्या मातोश्री अंजानी किरवले यांना राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला नारीरत्न पुरस्कार
जालना : रामु चव्हाण
निराधार ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध, मनोरुग्णांची अविरत सेवा करणाऱ्या जालना येथील अंजानी फाऊंडेशनच्या नावाने जाहीर झालेला कर्तृत्ववान महिला नारीरत्न पुरस्कार अध्यक्षा ज्योती आडेकर, सचिव विद्या जाधव यांनी मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला नारीरत्न पुरस्कारा पाहुण्याच्या हस्ते स्वीकारला .मंगळवारी ( दि.22 ) दादर – माटुंगा येथील सांस्कृतिक केंद्रात आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
मुंबई येथे पार पडलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक रमेश आव्हाड हे होते. तर हभप श्यामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर, इंटरनॅशनल टॅलेंटेड आयकॉन डॉ. महालक्ष्मी वानखेडकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचे संयोजक प्रकाश सावंत, समुपदेशिका मीनाक्षी गवळी यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा कदम यांनी केले.