महाराष्ट्रासह देशभरामध्ये कोरोना महामारीचा उद्रेक गेली दोन ते तीन वर्षांपासून नेहमी सुरू असल्याने शाळा कधी बंद तर कधी सुरू होत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होताना पहावयास मिळत आहे . 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ,प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी, एक मे महाराष्ट्र दिन त्याचप्रमाणे विविध शासकीय दिनाच्या दिवशी सुद्धा शाळेतून प्रभातफेरी निघायची पण कोरोना महावारी मध्ये या प्रभातफेरी निघणे बंद झाल्याने विद्यार्थ्यांची ही मोठी हिरमोड होताना पहावयास मिळत आहे. वसमत शहरातील ब्राह्मण गल्ली येथील छोट्या चिमुकल्यांनी या प्रभात फेरी चा आनंद घेण्यासाठी स्वयंस्फूर्तीने प्रभात फेरी काढून ध्वजारोहण केले या चिमुकल्यांचा उत्साह पाहून अनेकांना लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. भारत माता की जय, वंदे मातरम, एक रुपया चांदी का देश हमारा गांधी का असे म्हणत या बालकांनी ब्राह्मण गल्लीतून प्रभातफेरी काढली यात रिद्धी महाराज,श्रध्दा मोरे,श्रध्दा चव्हाण,संस्कृत डांगे, अलोपा डांगे ,श्रेया चव्हाण,शुभंकर डांगे,स्नेहा चव्हाण,आराध्या तांबोळी ,आदिनाथ तांबोळी ,दुर्गा तांबोळी ,अभिराम पारवेकर,केतकी डरंगे , श्रध्दा पवार सह चिमुकले सहभागी झाले होते
यावेळी प्रभात फेरी काढलेल्या बालकांना दै सामनाचे व वसमत सिटी न्यूजचे पत्रकार रामु चव्हाण, भाजपाचे ज्येष्ठ नेते विनायक महाराज यांच्यासह नंदकिशोर पारवेकर यांनी बालकांना खाऊ चॉकलेट बिस्किटांचे वाटप यावेळी केले. यावेळी चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता यामुळे लवकरात लवकर शाळा सुरू करून चिमुकल्यांचे भविष्य व होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.