व्याख्याते सैंगराजदादा बिडकर (सातारा)
पंचकृष्ण यांना नमन करून प्रवचनाला सुरवात करण्यात आली. नंतर सत्संगाला सुरवात झाली.
आज ज्ञानाचे महत्व समजावून सांगितले,तसेच ते ज्ञान परमेश्वर स्वतः जीवमात्रांना कशाप्रकारे सांगतात ही गुह्य माहिती सांगितली, ते ईश्वराचे ज्ञान ग्रहण करण्यासाठी आपण सर्वांनी गुरुकडे / गुरूकुला मध्ये जाऊन ग्रहण करावं त्या मुळे मनुष्याच्या ठिकाणी ध्येर्य प्राप्त होत. ज्या प्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला रणांगणात श्रीमद्भवद्गीता निरूपण करून त्याच्या मनातील मोह नष्ट करून त्याला अधर्माच्या विरुद्ध युद्ध करायला लावले, त्या मुळे मनुष्याला परमार्थात परिपक्व बनायचे असेल तर गुरुकडे जाऊन ईश्वराचे ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे, जर आपल्याकडे एखाद्या गोष्टीचे ज्ञान नसेल तर अनेक संकटांना तोंड देता येत नाही. तसेच परमेश्वराचे नामस्मरण केल्याने मनुष्यला होणारे लाभ याचे निरूपण केले. त्याच प्रमाणे मराठीचे आद्य ग्रंथकार पंडित म्हाईमभट्ट यांच्या ग्रंथ कर्तृत्वाची व कार्याची माहीती दिली व श्रीकृष्ण भगवंताच्या नामाचा जयघोषात आजचे चवथे सत्र संपन्न झाले.
कार्यक्रम संयोजक – म.जा यराजबाबा कपाटे सद्भावना फाउंडेशन .