वसमत शहरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीमध्ये चक्क 20 ते 22 वर्षे तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दि 02 ऑक्टोबर रोजी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
वसमत शहरातील बुखार तकीया येथे राहणाऱ्या सय्यद असलम सय्यद सरफराज याचा कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळलेला आहे.
वसमत शहरातील कवठा रोडवर असलेल्या वीरशैव लिंगायत वाणी तेली समाजाची स्मशानभूमी असून या स्मशानभूमीमध्ये सकाळी काही नागरिक स्वच्छता करण्यासाठी जात असताना तेथे त्यांना कूजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह दिसला यावेळी त्यांनी तात्काळ वसमत शहर पोलिसांना ही माहिती दिली असता वसमत उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी सदरील मृतदेहाचे गुप्तांग कापण्यात आले असून मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला यावेळी आजूबाजूला विचारपूस केली असता सदरील मृतदेह सय्यद अस्लम सय्यद सरफराज या राहणार बुखारी तकिया वसमत या इसमाचा असल्याचे कळले असून सदरील इसमहा गेली तीन ते चार दिवसांपासून बेपताव असल्याची सुद्धा नागरिकांमध्ये चर्चा होती. यामुळे सदरील आढळलेल्या मृतदेहाचा खून झाला असावा असा संशय नागरिक व्यक्त करत आहेत या प्रकरणाचा पुढील तपास वसमत शहर पोलीस करत आहे.