शिरड शहापूर येथे कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा टाटा एस कंपनीचा पिकअप कुरुंदा पोलिसांनी पकडला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक १३ जून रोजी सकाळी आठ वाजता शिरडशहापूर येथील सरकारी दवाखान्यासमोरील रोडवर हॅलो टाटा एस कंपनीचा क्रमांक MH12EQ4216 या पिकप मध्ये आरोपीत किरण बाबुराव गायकवाड रा.शिरडशहापूर,बबलू ईमाम कुरेशी राहणार शिरड शहापूर यांनी पांढऱ्या रंगाच्या टाटा एस मध्ये एक पांढ-या रंगाची गाय ,दोन गोरे वाहनाच्या अपुऱ्या जागेत दाटीवाटीने कोंबून त्यांना दुखापत होईल अशा स्थितीत निर्दयपणे क्रुरूरतेने भरून सदर गाय व गोरे यांना वेदना होतील अशा सद्यस्थितीत अवैध कतलीकरिता बेकायदेशीर रित्या वाहतूक करीत असताना कुरुंदा पोलिसांना मिळून आले.
यावेळी कुरूंदा पोलिसानी सदरील टाटा एस यातील एक गाय आणि दोन गोरे असा एकूण दोन लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना ताब्यात घेतण्यात आले आहे त्यांच्यावर कुरुंदा पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास कुरूंदा पोलिस करत आहेत .