
वसमत/रामु चव्हाण
ग्राहक या नात्याने तुम्हाला अनेक अधिकार दिलेले आहेत आणि या अधिकारांची माहिती घेऊन तुम्ही जागरुक ग्राहक बनू शकता. शिवाय या अधिकारांची माहिती असल्यामुळे तुम्ही फसवणुकीपासून वाचू शकता. सरकारकडूनही ग्राहकांच्या जनजागृतीसाठी वेळोवेळी जाहिराती जारी केल्या जातात. तुमची फसवणूक होत असेल तर त्याची तक्रार कुठे करावी, याची माहिती तुम्हाला जाहिरातीमधून मिळते. कुणाकडून तुमची फसवणूक झाली असेल तर तुम्ही संबंधित विक्रेत्याला धडा शिकवू शकता आणि तुमची नुकसान भरपाईही मिळवू शकता असे मत नायब तहसीलदार व्हि.व्हि तेलंग यानी राष्ट्रीय ग्राहक दिन
यानिमित्ताने बोलताना सांगितले jagograhakjago.gov.in ही खास नवी वेबसाईट लाँच केली आहे. या वेबसाईटवर ग्राहकांशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळेल. ग्राहकांचे अधिकार, तक्रार आणि इतर सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळेल.
ग्राहक हक्क संरक्षणासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारानेच देशात ग्राहक संरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकावर 24 डिसेंबर 1986 रोजी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर देशभरात तो कायदा म्हणून लागू करण्यात आला. त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून भारतात 24 डिसेंबर रोजी ‘राष्ट्रीय ग्राहक दिवस’ साजरा करण्यात येतो. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे सर्व ग्राहकांना सुरक्षेचा अधिकार, उत्पादनाबाबतच्या माहितीचा अधिकार, निवडीचा अधिकार, तक्रार निवारणाचा अधिकार आणि ग्राहक शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे. या आधारे एखाद्या उत्पादन सेवेबाबत जाणून घेणे त्याबाबत तक्रार असल्यास त्याचे निरसन करुन घेण्याचा हक्क नागरिकांना मिळू शकला. या कायद्यामुळे ग्राहकांचे हक्क जोपासण्याच्या द्ष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले असे मत नायब तहसीलदार व्हि व्हि तेलंग यानी सांगितले ..
यावेळेस बोलताना नदाफ बशीर (मराठवाडा उपाध्यक्ष अ.भा.ग्रा.कल्याण परिषद),बेग अमजद इस्माईल ( अ.भा.ग्रा.कल्याण परिषद),सुहास देशमुख (सचिव अ.भा.ग्रा.कल्याण परिषद).शेख इसाक शे.इब्राहीम ( जिल्हा कार्याध्यक्ष अ.भा.ग्रा.कल्याण परिषद),
यानी ही ग्राहक चे अधिकार व फायदे या बाबत मार्गदर्शन केले .
तर पत्रकार व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य रामु चव्हाण यानी ग्राहक संरक्षण परिषद समिती चे कार्य,ग्राहकाना येणा-या अडचणी व बैठकीस जसेकी राशन दुकानदार प्रतिनिधी,गॅस पुरवठादार प्रतिनिधी,पेट्रोल पंप चालक प्रतिनिधी,विद्युत विभाग प्रतिनिधि,आगर महामंडळाचे प्रतिनिधी याना दरवेळेस ग्राहक दिनाला बोलवून ग्राहकाच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यानाही मार्गदर्शन करता येईल व ग्राहकांच्या अडचणी सोडवण्यास मदत होईल अशी मागणी सर्व ग्राहक संरक्षण परिषद सदस्यांच्या वतीनेही करण्यात आली..यावेळेस पत्रकार,ग्राहक,राशन दुकानदार पुरवठा विभागाचे शे.एजास,संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.