
वसमत/ रामु चव्हाण
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काल झालेल्या राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विविध हालचाली झालेल्या दिसून येतात. यामध्ये अजित दादा पवार यांच्यासोबत गेलेले नऊ मंत्री आणि काही आमदार हे अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचे चर्चा संपूर्ण दिवसभर माध्यमांवर पसरत होती.
यावेळी वसमत विधानसभेचे आमदार राजुभैय्या नवघरे आणि माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे कोणासोबत जाणार असा तर्क वितर्क वसमत विधानसभेमध्ये लावल्या जात होता. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू मानले जाणारे सहकार महर्षी जयप्रकाश दांडेगावकर तसेच वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे यांनी सुद्धा याबाबत आज वसमत व विधानसभा कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली यामध्ये जोपर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आदेश येत नाहीत तोपर्यंत आम्ही शरद पवारांसोबतच आहोत असे ठामपणे सांगत सर्व कार्यकर्त्यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सोबतच राहण्याचे आवाहन माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर आणि आमदार राजू भैया नवघरे यांनी निर्धार व्यक्त केला.
यामुळे आम्ही कुठेही जाणार नसून जोपर्यंत पवार साहेबांचा आदेश येत नाहीत तोपर्यंत आम्ही शरद पवार साहेबांसोबतच राहणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.