
वसमत/ रामु चव्हाण
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे वसमत शहरातील विविध प्रभागांमध्ये थेट प्रक्षेपण कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेण्यात आला.
वसमत शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रधानमंत्री यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे प्रक्षेपण दाखविण्यात आले यावेळी प्रधानमंत्री यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी विविध विषयांवर आपले मत मांडले.
वसमत शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला असून या कार्यक्रमाचे नियोजन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवदास बोडेवार,भाजपा शहर अध्यक्ष तथा नगरसेवक शिवाजीराव अलडिंगे, नगरसेवक विष्णू बोचकरी ,आक्षय भोसले,आकाश बोकन,भाजपा उपशहराध्यक्ष नारायण पवार,मुन्ना बोकन,संदेश अग्रवाल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.