शहर पोलिसांची गुटख्यावर धाड 2 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
वसमत/ रामु चव्हाण
वसमत शहरात सुरू असलेला अवैध गुटखा यावर वसमत शहर पोलिसांनी धाड टाकत दोन लाख एकाहत्तर हजार तीनशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वसमत शहरात गल्लोगल्ली अनेक ठिकाणी पान टपरीवर दुकानावर खुलेआम अवैध गुटखा होत असून त्याचा प्रत्यय वसमत शहरात एका कार मध्ये गुटखा घेऊन येत असल्याची माहिती वसमत शहर पोलिसांना मिळाली आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास साई मंदिराजवळील चेेेेपूरवार यांच्या शेताजवळ आसेगाव रोड वसमत येथे पांढरा रंगाचे स्विफ्ट डिझायर कंपनीच्या कार मध्ये तीन पांढऱ्या रंगाच्या नायलॉनच्या पोत्यांमध्ये राजनिवास पान मसाला तसेच आर एम डी, जाफरानी जर्द्याचे पुढे व एक पांढऱ्या रंगाचे स्विफ्ट डिझायर कंपनीची कार एम एच 03 बीसी 0841 यामध्ये सदरील शासनाने प्रतिबंधित घातलेला गुटखा मिळून आला सदरील आरोपीत सुनील सदावर्ते राहणार हिवरा खुर्द हल्ली मुक्काम पावरलूम वसमत यास ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याजवळ दोन लाख हजार तीशशे साठ रुपयांचा अंदाजित किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
याप्रकरणी शेख नय्यर शेख शब्बीर यांच्या फिर्यादीवरून देऊन वसमत शहर पोलीस ठाणकामध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे हे करत आहेत सदरील कारवाईत पोलीस कर्मचारी कृष्णा चव्हाण ,शेख नय्यर, गुंडरे ,संदीप चव्हाण ,आदीनी केली