
वसमत / रामु चव्हाण
वसमत तालुक्यातील कुरुंदा पोलीस स्टेशन च्या पथकाने आज देशी दारू सह एका वाहनावर कारवाई करत अंदाजे तीन लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आज कुरुंदा येथून बोल्ड मार्गे एका जीपमध्ये देशी दारुचे बॉक्स घेऊन जात असल्याची गुप्त बातमी मिळाल्यावरून कुरुंदा ठाण्याचे ठाणेदार सपोनि सुनील गोपिनवर,फौजदार गवळी , पोना बालाजी जोगदंड, पोलीस जमादार गजानन भोपे ,संतोष पटवे, बबन देवकर ,बापूराव बाभळे , कोल्हे यांनी सदर जीपचा पाठलाग करून जीपची तपासणी केली असता सदर जीपमध्ये वीस बॉक्स देशी दारुचे मिळुन आल्याने जीपसह चालकास ताब्यात घेण्यात आल्या असून एकूण अंदाजे 3 लाख 57 हजाराचा मुद्देमाल कुरुंदा पोलिसांनी जप्त केला आहे.या प्रकरणी एका विरूध्द कुरूंदा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.