वसमत येथे रविवारी शौर्य पंथसंलन व धर्मसभेचे विश्व हिंदु परिषद व बजरंग दल यांच्या वतीने आयोजन
रामु चव्हाण

वसमत : – रामु चव्हाण
वसमत येथे दि.09 मार्च रविवार रोजी विश्व हिंदु परिषद ,बजरंग दल यांच्या वतीने शौर्य पथसंचलन वसमत शहरातुन दि.09 मार्च रविवारी दुपारी 2-00 वा. अभिनव राम मंदिर पोलीस क्वार्टर रोड वसमत येथुन निघणार आहे ते गवळी मारोती मंदिर-शिवतीर्थ छ.शिवाजी महाराज पुतळा-श्रीराम पेठ -झेंडा चौक -मामा चौक व जिल्हा परिषद मैदानावर या पथ संचलन पोहचेल व सायं. 6 वा जिल्हा परिषद मैदानावर भव्य धर्म सभा होणार असून या सभेस प्रमुख वक्ते- निरजजी दौनेरिया (राष्ट्रीय संयोजक बजरंग दल दिल्ली ),विवेकजी कुलकर्णी ( क्षेत्रिय संयोजक बजरंग दल ),प.पु.108 महंत ज्ञानेश्वर भारती महाराज ( दत्त संस्थान माहूर गड ) ,प.पु.108 महंत डाॅ पद्मनाभ गिरिजी महाराज ( पद्मावती मठाधिपती औंढा नागनाथ ) हे उपस्थित राहणार आहेत. तसेच युवा शाहीर यशवंत जाधव यांचा शिवचरित्रावर शाहीर पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .