
वसमत / रामु चव्हाण
पाक व्याप्त काश्मीर सह अखंड भारताचे स्वप्न 2030 पर्यंत पूर्ण होणार असल्याचा विश्वास भास्करराव ब्रम्हनाथकर यांनी व्यक्त केला. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने “अखंड भारत समर्थ भारत” करण्याचा संकल्प प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी शेकडो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये केला. झेंडा चौकात संपन्न झालेल्या कार्यक्रमात भारत मातेचे पूजन करून संकल्प सिद्धीस नेण्याचे मनोभावे एक मुखाने ठरवले .प्रमुख वक्ते माननीय भास्कर रावजी ब्रह्मनाथकर यांनी फाळणीपूर्व असणाऱ्या अखंड भारताचा नकाशा डोळ्यासमोर उभा करून आज सिंधू नदी लाहोर पाकव्याप्त काश्मीर ही अखंड भारताची भळभळणारी जखम आहे अखंड भारताचे तुकडे म्हणजेच काँग्रेसचा इतिहास आहे. महात्मा गांधींनी भारताचे विभाजन होणार नाही असं म्हणत अचानक फाळणीला परवानगीच दिली नाही तर पुन्हा 55 कोटी देण्यासाठी आमरण उपोषणाला बसले हे अनाकलनीय आहे .फाळणी होत असताना लाखो हिंदूंची कत्तल भारतात व पाकिस्तानमध्ये झाली. हि खंत संघ स्वयंसेवकांच्या मनात वर्षानुवर्षांपासून आहे भविष्यात अखंड भारताचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे हिंदू संघटित झाला की इतिहास बदलतो याचे अनेक दाखले मागच्या दोन ते तीन दशकांमध्ये आपणास पाहायला मिळतात असेही ब्रम्हनाथ कर यांनी विवेचन केले कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे तालुका अध्यक्ष गणेश काळे विहिपचे विभागीय सेवा विभागाचे प्रमुख प्रकाश शहाणे ज्येष्ठ समाजसेवक व नगरसेवक सिताराम म्यानेवार मारुती कदम राजू भालेराव संतोष कदम राम पाटील अर्जुन कदम शामराव कदम हर्ष काबरा अभिषेक केजकर विनायक आग्रवाल महेश डावरे अभिषेक पाठक यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार पंकज नांदापूरकर सत्यविजय अनवेकर यांची विशेष उपस्थिती होती ब्रम्हनाथकर यांच्या प्रगट भाषणापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासूनh शहराच्या मुख्य रस्त्यावरून पदयात्रा काढून लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी भारत मातेच्या सजीव देखाव्यासह पदयात्रा काढण्यात आली होती.