वसमत शहरातील जयप्रकाश नारायण ना.स.बँकेतील लिपिकाचा प्रामाणिकपणा आज पहावयास मिळाला चक्क सापडलेली 5 ग्रॅम सोन्याची अंगठी बॅक ग्राहकाला परत केली.त्यामुळे त्या लिपिकाचे सर्वत्र अभिनंदन होत आहेत.
या बाबत माहीती अशी की वसमत येथील शाखा सचिव संतोषराव पतंगे हे आज दि.16/12/2024 रोजी सकाळी काही कामानिमित्त जयप्रकाश बँकेत गेले असता त्यांची 5 ग्रॅम सोन्याची अंगठी त्यांच्या हातुन पडली .
काही वेळेनंतर घरी आल्यावर त्यांच्या लक्षात आले की अंगठी हातात नाही त्यानी बराच वेळ शोध घेतला पण अंगठी काही मिळून आली नाही.यावेळेस जयप्रकाश बँकेतील लिपीक भगवान खराटे यांना सदरील अंगठी सापडली त्यानी सदरील अंगठी बँकेचे व्यवस्थापक भिमराव गोरे यांना दिली व सदरील अंगठी ही संतोष पतंगे यांची असल्याचे सांगितले.
यावेळेस गोरे यांनी सदरील बँकेचे ग्राहक संतोषराव पतंगे यांना सदरील अंगठी सापडल्याचे सांगितले व बॅकेचा वतीने गोरे व भगवान खराटे यांनी सदरील अंगठी ग्राहक संतोषराव पतंगे यांना परत केली.
जयप्रकाश बॅकवर अगोदरच अवसायक आहे.कर्मचारी वर्ग कमी करण्यात आलेला आहे भगवान खराटे हे अल्प मानधनावर काम करत आहेत. त्यांचा घरची परिस्थितीही हालाकीची आहे.त्यांचा याच प्रामाणिकपणा मुळेच त्याना अवसायक तथा सहा.निबंधक कटलेवाड यानी सुद्धा बँकेत कामावर ठेवले आहे.तसेच या बँकेतील अनेक कर्मचारी कमी केले आहेत पण प्रामाणिक भगवान खराटे यांना कामावरून कमी केले नाही.आज त्यानी 5 ग्रॅम सोन्याची अंगठी परत केल्याने अवसायक तथा सहा.निबंधक कटलेवाड ,ग्राहक संतोषराव पतंगे ,व्यवस्थापक भिमराव गोरे,गोपाळ भोसले सह बॅक कर्मचारी यानी अभिनंदन केले आहे