बांधकाम कामगारांना आत्यावश्यक संच व सुरक्षा संच तात्काळ देणे बाबत निवेदन

जनकल्याण बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने सचिव तथा मुख्यकार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई श्री.विवेक कुंभार यांना निवेदन सादर
मुंबई/ प्रतिनिधि
श्री.राजकुमार शंकर सुतारे संस्थापक अध्यक्ष जनकल्याण बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांना निवेदन देण्यात आले.त्यामध्ये मंडळा मार्फत नोदीत जीवित सक्रिय बांधकाम कामगारांना महाराष्ट्र राज्यात देण्यात येणाऱ्या सुरक्षा संच व आत्यावश्यक संच (पेट्या) वाटपचे काम चालू आहे परंतु 31 मार्च 2022 पूर्वीच्यांच नोंदीत बांधकाम कामगारांना आत्यावश्यक संच व सुरक्षा संच (पेट्या) वाटप केल्या जात आहेत परंतु काही जिल्यातील ऑनलाईन चे कामकाज हे कासव गतीने होत असल्याने अनेक कामगारांची नोंदणी ही वेळेत होत नाही.त्यामुळे अनेक बांधकाम कामगारांची नोंदणी ही उशिरा झाली असल्याने आज रोजी वरील योजनेचा लाभ मिळत नाही यामध्ये कामगारांची काही चुक नसताना त्यांना या योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.सध्या 1 एप्रिल 2022 नंतर नोंदणी व नूतनीकरण झालेल्या महाराष्ट राज्यातील प्रत्येक जिल्हा सरकारी कामगार अधिकाऱ्या मार्फत
दहा हजाराच्या वर नोंदणी व नूतनीकरण आहे .हे बांधकाम कामगार वंचित राहतात की काय असा संभ्रम बांधकाम कामगारामध्ये होत आहे.समंधित कंत्राटदार पेट्या वाटप करणारी कंपनी ही 1 एप्रिल 2022 नंतरच्या बांधकाम कामगारांसाठी साहित्य आलेले नाही असे सांगून परत पाठवत आहेत्.तरी.मा.सचिव तथा मुख्यकार्यकारी अधिकारी महाराष्ट इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री.मा. विवेक शंकर कुंभार यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व बांधकाम कामगारांना आत्यावश्यक संच व सुरक्षा संच (पेट्या) संबंधित कंत्राटदारास् आदेशीत करून बांधकाम कामगारांना आत्यावश्यक संच व सुरक्षा संच (पेट्या) मिळाव्या तसे आदेश् पारीत करून जनकल्याण बांधकाम कामगार संघटनेला सहकार्य करावे असे निवेदन देण्यात आले.