
वसमत (प्रतिनिधी )
औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी तंत्र प्रदर्शन चे आयोजन करण्यात आले होते सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन पत्रकार नाहीद सिद्दीकी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पत्रकार नंदू परदेशी, श्रीधर वाळवंटे, नागेश चव्हाण यांची उपस्थिती होती. याप्रसंगी
प्र. गट निर्देशक मनीष परदेशी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले की, आमच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी भविष्यात नक्कीच उद्योजक बनतील असे मत व्यक्त केले तर पत्रकार नाहीद सिद्दीकी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले की, आय टीआय चे सर्वच ट्रेड महत्त्वाचे व उद्योजक होण्यासाठी आहे जिद्द असल्याने माणूस नक्कीच यशस्वी होते असे मत व्यक्त केले. सदरील तंत्र प्रदर्शन कार्यक्रमास संस्थेतील प्रशिक्षणार्थीनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी टाकाऊ साहित्यापासून घरगुती यंत्रणे तसेच वेगवेगळे मॉडेल तयार केले होते विशेष म्हणजे हायड्रोलिक बोर मशीन, एअर कुलर, वॉटर कुलर, ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट, मिनी चिली कटर हे लक्षणीय होते तर मॉडेल मध्ये लाकडी तोफ, राजमुद्रा, बॅगल स्टॅन्ड, मेणबत्ती तसेच उदबत्ती स्टँड, करवत लक्ष वेधून घेत होते. सदरील कार्यक्रम हा कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करून घेण्यात आला होता.
या तंत्र प्रदर्शनास संस्थेतील प्र. गट निर्देशक मनीष परदेशी व निर्देशक कुलकर्णी, कौरवार, वानखेडे, कानगुले, वाहेवळ, खंदारे, दळवी, व कु. शिंदे दिव्या यांनी विशेष परिश्रम घेतले.