हिंगोलीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्राला मान्यता.
वसमत | रामु चव्हाण
स्व.यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या विचार आणि कृतीने महाराष्ट्र आणि देश घडविण्याचा प्रयत्न केला.त्यांच्या विचारांचा वारसा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे.हिंगोली येथील जिल्हा केंद्र देखील त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविण्यासाठी कटीबध्द राहिल असे प्रतिपादन आमदार चंद्रकांत उर्फ राजुभैया नवघरे यांनी केले. ते प्रतिष्ठानच्या पहिल्या बैठकीत अध्यक्ष म्हणून बोलत होते.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून त्यांची तर सदष्य म्हणून प्रा.डॉ. विशाल पतंगे, प्रा.संध्या रंगारी,डॉ. केशव खटींग, मतीन इनामदार, राजा कदम, अंबादास जाधव,ज्योती कोथळकर यांची निवड झाली आहे.यावेळी या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.बैठकीत पुढील ध्येय धोरणे ठरविण्यात आली. यावेळी रमेश कदम यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन राजा कदम यांनी केले.