आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आयोजित प्रशिक्षणास शिबिरास दांडी मारणा-या सहा कर्मचाऱ्यांचा निलंबनाचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केल्याचे माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांनी दिली आहे.
दि.27/02/2024 रोजी सकाळी 11.00 वाजता मा.उपविभागीय अधिकारी,वसमत यांचे अध्य्क्षतेखाली लोकसभा सार्वत्रीक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निवडणूक कामकाजाकरीता तहसिलदार,वसमत व औंढा (ना) तसेच वसमत व औंढा (ना) तालुक्यातील क्षेत्रीय अधिकारी व सर्व नोडल अधिकारी कक्ष प्रमुख यांची बैठकीमध्ये आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीबाबत क्षेत्रीय अधिकारी व नोडल अधिकारी यांना सविस्तर प्रशिक्षण देण्यांत आले आहे.
तसेच दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2.00 वाजता FST,SST,VST,VVT या पथकांमधील नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे निवडणुक विषयक कामाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
15-लोकसभा सार्वत्रीक निवडणुक 2024 सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी यांनी निवडणुक कामकाजामध्ये दिरंगाई किंवा निष्काळजीपणा होणार नाही याबाबत सक्त ताकीद दिलेली असून सदरील बैठकीस अनुउपस्थित क्षेत्रीय अधिकारी,नोडल अधिकारी,FST,SST,VST,VVT पथकातील 6 अधिकारी –कर्मचारी अदयापही निवडणुक कामकाजामध्ये गांभीर्याने घेत नसल्याचे निदर्शनास आल्यावरुन त्यांचे विरुध्द निलंबनाची प्रस्ताव मा.जिल्हा निवडणुक अधिकारी यांचे कडे सादर करण्यात आलेला आहे.
आगामी लोकसभा निवडणुक कामाकाजामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा निष्काळजीपणा माफ केल्या जाणार नाही तेव्हा सर्व निवडणुक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी तथा कर्मचारी यांना समज देण्यात आली असल््यचे डॉ.सचिन खल्लाळ उपविभागीय अधिकारी, वसमत तथा
मतदार नोंदणी अधिकारी 92-वसमत विधानसभा मतदार संघ यानी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे