
वसमत/ रामु चव्हाण
वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे जवळपास 3000 कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले तर अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे तसेच पुराच्या पाण्यामुळे इतर आजार बळावले असून यामध्ये अनेक नागरिकांना आजार जडले असताना वसमत येथील माहेर हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी तथा वसमत उपजिल्हा रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सनाउल्ला खान व त्यांच्या पत्नी डॉक्टर हिना खान यांनी जनसेवा हीच ईश्वर सेवा मानत कुरुंदा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेऊन कुरुंदातील अनेक नागरिकांच्या मोफत तपासणी करून त्यांना औषधांचे वाटप केले.
कुरुंदा येथे जवळपास 900 च्या वर नागरिकांच्या मोफत तपासण्या यावेळी माहेर हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले.यामध्ये नागरिकांना ताप, सर्दी, खोकला याचबरोबर पाण्यामुळे झालेले इतर आजार यांविषयी तपासणी करून त्यांना योग्य ती काळजी घेण्याबाबत सूचना व औषधांचे मोफत वाटप डॉक्टर सन्नानालाउ खान व डॉक्टर हिना खान यांच्या वतीने करण्यात आले.
माहेर हॉस्पिटल च्या वतीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत अनेक गरजूंना मोफत आणि माफक दरामध्ये औषधांचे वाटप आणि उपचार केला जातो वसमत तालुक्यातील नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी असणारा माहेर हॉस्पिटल यांचे स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या कार्याबद्दल गावचे सरपंच माजी सभापती राजेश पाटील इंगोले यांच्या वतीने त्यांचा सत्कार यावेळी ग्रामपंचायत कार्यालया येथे करण्यात आला.