ताज्या घडामोडी

गोदावरी अर्बनची कौतुकाची थाप -डॉ. राम भोसले, यांच्या हस्ते सीए ज्ञानोबा चव्हाण यांचा सत्कार

रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण

सर्व सामान्य कुटुंबातील मुलांमध्ये देखील शिक्षणाप्रती जिद्द असते. त्यांच्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर असे विद्यार्थी जिवघेण्या स्पर्धेत उतरतात मात्र त्यांची आर्थिक बाजू कमजोर असल्यानेच ते पुढे या स्पर्धेत टिकुन राहावित यासाठी त्यांना गोदावरी अर्बन संस्था सामाजिक बांधिलकिच्या माध्यमातून अभ्यासू, हुशार विद्यार्थ्यांच्या पाठिवर कौतुकाची थाप देत आहे हे कौतुकास्पद असल्याचे वक्तव्य डॉ. राम भोसले यांनी येथे केले.
गोदावरी अर्बनचे संस्थापक तथा खासदार हेमंत पाटील, गोदावरी समुहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत येथील गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को. आप. सोसायटी लिमिटेड शाखा वसमतच्या वतीने शेतकरी ज्ञानोबा व सुनीता चव्हाण या शेतमजूर दांपत्याने रोजमजुरी करून हलकीचे जीवन जगत मुलगा विष्णुला उच्चशिक्षण देऊन सीए पर्यंत पोहचविल्यानंतर गोदावरी अर्बन म. क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नांदेड शाखा वसमत शाखेच्या वतीने डॉ.. राम भोसले त्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी गोपीनाथ भोसले, शाखा अधिकारी अशोक चोपडे, अधिकारी संगीता नाकोड, जुनिअर ऑफिसर- रामदास गोंदेश्वर, जगन्नाथ खराटे, राहुल सूर्यवंशी, गोविंद सारंग, संतोष वैरागड, प्रवीण जाधव यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!