वसमत शहरामध्ये गेली आठ ते दहा दिवसांपासून सेतू सुविधा केंद्राचे सर्वर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणारे शासकीय प्रमाणपत्रे मिळण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.
सर्व डाऊन असल्यामुळे उत्पन्न, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी, यांच्यासह विविध शासकीय दाखले मिळण्यासाठी पालकांना विद्यार्थ्यांना सेतू केंद्राच्या खेटा मारावे लागत असल्यामुळे पालक आणि विद्यार्थी त्रस्त झाले असून याकडे संबंधित महसूल विभागाने त्वरित लक्ष देऊन सदरील प्रकरणी लवकरात लवकर सर्वर दुरुस्त करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावेत अशी मागणी विद्यार्थी व पालकातून होत आहे. सध्या दहावी बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये अकरावी डी फार्मसी बी फार्मसी शासकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विविध शासकीय दाखले लागत असून सर्वर बंद असल्यामुळे सदरील शासकीय दाखले मिळण्यासाठी वसमत शहरांमध्ये गेली दहा दिवसांपासून अडचण निर्माण झाली आहे. त्यात त्यामुळे सर्वर लवकरात लवकर दुरुस्त करावे अशी मागणी पालक वर्गातून व्यक्त होत आहे
याबाबत वसमत तहसीलचे नायब तहसीलदार निलेश पळसकर यांच्याशी संपर्क साधला असता सदरील सर्वर डाऊन असल्यामुळे त्यांनी महाआयटी कंपनीकडे तक्रार नोंदवले असून डाटा सर्वरचे काम सुरू असल्यामुळे सर्वर डाऊन असल्याचे सांगितले तर लवकरात लवकर सर्वर दुरुस्त होईल असेही नायब तहसीलदार निलेश पळसकर यांनी सांगितले.