श्रीमद्-महावाक्य निरूपण तथा बेलापूर चरित्र निरूपण सोहळा, कुरुंदा, ता वसमत, जि हिंगोली येथे होत असलेल्या सत्संग सोहळ्यात
सातवा दिवस
आज सत्संगात आत्मनिवेदन या विषयावर निरूपण झाले.साधनामार्गावर वाटचाल करतांना आपल्यासाठी प्राणप्रिय असणारा आपला सखा भगवंत.आत्मनिवेदन म्हणजे देवास आपण अर्पण होणे.ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति’ असे भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितले आहे. ईश्वराच्या निवासाचे स्थान हृदय म्हटले आहे म्हणून अंतःकरणात भाव हा दुःखपूर्वक असावा त्यात ईश्वर भेटीची ओढ असावी,त्याचे दास्य सेवा घडावी ही उतकंठा असावी आणि घडलेल्या चुकांबद्दल दोषांबद्दल मनुष्याच्या अंतःकरणात दुःख असावं त्यावेळी भगवंत आपल्याला सेवेचा स्वीकार करतात, नुसता भाव नव्हे तर त्या बरोबर तुला ईश्वराने सांगितलेले ज्ञान पण अंतःकरणात असावे,त्या श्रुतीवर मनुष्याचे दैनंदिन जीवनचक्र असावे.असे निरूपण केले.त्याच प्रमाणे हिंसा या विषयावर निरूपण केले.
अहिंसेचे पालन करण्यासाठी साधकाने प्रथम हिंसा म्हणजे काय हे जाणून घेणे आवश्यक आहे व त्यानंतरच हिंसेचा त्याग करता येणे शक्य आहे. जर हिंसेचा अंतर्भाव असलेली कोणतीही कृती मनुष्याने स्वत: केली कृत किंवा इतर कोणाकडून करवून घेतली कारित किंवा हिंसेला अप्रत्यक्षपणे अनुमोदन दिले अनुमोदित, तरी तीही हिंसाच ठरते यांपैकी कोणत्याही प्रकारे हिंसा घडली, तरी अनंत काळापर्यंत दु:ख व अज्ञानरूपी फळ प्राप्त होते, याची सर्वदा जाणीव ठेवून साधकाने सर्व प्रकारच्या हिंसेचा सर्वथा त्याग केला पाहिजे. व श्री कृष्ण भगवंताच्या नामाचा जयघोषात आजचे पाचवे सत्र संपन्न झाले.
वकार्यक्रम संयोजक – सद्भावना फाउंडेशन (बोरी)