श्रीमद्-महावाक्य निरूपण तथा बेलापूर चरित्र निरूपण सोहळा, कुरुंदा, ता वसमत, जि हिंगोली येथे होत असलेल्या सत्संग सोहळ्यात
आठवा दिवस
आज सत्संगात जिवात्माचे दुःख या विषयावर निरूपण झाले. मराठीचा आद्यग्रंथ लीळाचरित्र यातील बेलापूर चरित्र या विषयांतर्गत वृक्षाचे दुःख या विषयावर निरूपण केले, या मध्ये नरक योनी मध्ये वृक्षाच्या जन्मात जीवाला जाऊन दुःख भोगाव लागत असे सांगितले. त्याच प्रमाणे इतर प्राण्यांच्या दुःखाचे पण विवेचन केले. तसेच अहिंसावाद या विषयावर थोडक्यात माहिती दिली. तसेच या संसारच्या दुःखातून मुक्त व्हायचे असेल तर श्रीकृष्ण महाराजांनी अठराव्या अध्यायात सांगितलेल्या मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु। या वचनाला अनुसरावे तरच या संसारच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो.जीवाला सर्व प्रकारच्या संसारव्यथेपासून सोडविण्यासाठी त्याने अनन्यभावाने शरण यावे , सर्वस्वी स्वतःला ईश्वरार्पण करावे .अश्याप्रकारे निरूपण मार्गदर्शन करून श्री कृष्ण भगवंताच्या नामाचा जयघोषात आजचे आठवे सत्र संपन्न झाले.
वकार्यक्रम संयोजक – सद्भावना फाउंडेशन (बोरी)