ताज्या घडामोडी

तामसा येथे सरसेनापती नेताजी पालकरांचे भव्य स्मारक उभारणार -खा.हेमंत पाटील

रामु चव्हाण

तामसा येथे सरसेनापती नेताजी पालकरांचे भव्य स्मारक उभारणार
खासदार हेमंत पाटील, यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

वसमत / रामु चव्हाण

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात नेताजी पालकर हे सरसेनापती होते. म्हणून इतिहासात त्यांच्या नावाची प्रतिशिवाजी अशी ओळख आहे. अशा शूरवीर योद्धाचे समाधीस्थळ हिंगोली लोकसभा मतदार संघातील हदगाव तालुक्यातील तामसा येथे आहे. प्रतिशिवाजी म्हणून जगभर ख्याती असलेले नेताजी पालकर यांचे समाधीस्थळी असलेल्या तामसा येथे भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
खासदार हेमंत पाटील यांनी नुकतीच दिल्ली येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रतिशिवाजी सरसेनापती नेताजी पालकर यांच्या साडेतीनशे वर्षापासून अडगळीस पडलेल्या समाधी स्थळाच्या जीर्णोद्धारासोबतच भव्य असे स्मारक उभरण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे. नेताजींचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील चौक,हे असून शिवाजी महाराजांनी त्यांना ६२ गावांतील जहांगिरी दिली होती. माहूरपासून पिंगळी तामसा गावचा समावेश त्यामध्ये होता. आजही त्यांचे नातेवाईक पिंगळी गावात वास्तव्य करतात. नेताजी पालकर यांची समाधी तामसा येथे नदीकाठी आहे. या समाधीचा जीर्णोद्धार झाला नाही की काय, असा प्रश्न शिव अनुयायांना पडतो. येणाऱ्या तरुण पिढीला नेताजींच्या कामगिरीचे कौतुक व इतिहास माहिती व्हावा यासाठी या समाधीचा जीर्णोद्धार आवश्यक आहे.तसेच त्याठिकाणी भव्य स्मारक उभारण्यात यावे याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी आग्रही भूमिका घेत मागणी केली आहे .

चौकट –

यापूर्वी प्रतिशिवाजी सरसेनापती नेताजी पालकर घराण्यातील तत्कालीन आमदार गणपतराव पालकर यांच्यासह तामसा येथील मूळचे असलेले तत्कालीन जिल्हाधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी पाठपुरावा केल्याचे समजेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडुन जनतेला खुप अपेक्षा आहेत. सामान्य लोकांच्या अपेक्षापूर्तीच्या दिशेनी मुख्यमंत्री काम करत आहेत. नेताजी पालकर स्मारक उभारणीसाठी त्यांनी विषेश लक्ष घातले आहे. नेताजी पालकरांच्या भव्य स्मारक उभारण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. असा शब्द मुख्यमंत्री यांनी दिला आहे. माझ्या कार्यकाळात नेताजी पालकर यांचे तामसा येथे देखणे व स्मारक उभारले जाईल.
-खासदार हेमंत पाटील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!