महाराष्ट्रात आलेले स्वतःच हिंदुत्ववादी म्हणून घेणार सरकार हे हिंदुत्ववादी नसून हे हिंदुत्व विरोधी सरकार असल्याचे घनाघात वसमत विधानसभेचे तरुण तडफदार आमदार राजू भैया नवघरे यांनी विधानसभेमध्ये बोलताना मांडले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना महाराष्ट्रातील तमाम देवी देवतांचे मंदिर ,मशीद शादी खाना यासाठी सभागृह व विविध कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला होता .त्यावेळी कुठल्याही समाजाला भेदभाव न करता हा निधी दिला गेला होता पण आता आलेलं युतीचे सरकार यांनी सदरील देवी देवतांचे मंदिर विकास कामासाठी दिलेला तसेच शादी खाना व विविध ग्रामीण विकासासाठी दिलेला निधी रोखल्याने यापुढे आम्ही हिंदुत्ववादी सरकार असं म्हणून घेणारे सरकार हिंदुत्ववादी सरकार नसून हा हिंदुत्वाचा निधी या सरकारने रोखला असल्याचे घनाघात आमदार राजू भैया नवघरे यांनी मांडला महाविकास आघाडी सरकारने निधी देताना कधीही देवी देवतांमध्ये भेदभाव केला नाही पण दिलेला निधी थांबवण्याचा या युती सरकारने पाप केला असून या निधी त्वरित वितरित करून हे थांबलेली कामे पुन्हा सुरू करावी या अशी मागणी आमदार राजू भैया नवघरे यांनी विधानसभेत केली