राखी पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षी संपूर्ण भारतात साजरा होतो हे करत असताना सीमेवरील जवान आपल्या रक्षणासाठी अहोरात्र डोळ्यातील तेल घालून पहारा देत असतात त्यांना ना कुठला सण ना कुठला उत्सव साजरा करण्यास वेळ मिळतो याचे भान ठेवून वसमत शहरातील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक अनोखा उपक्रम हाती घेऊन टाकाऊ वस्तु पासून तयार केलेल्या राख्या आपल्या भारतातील वीर जवान यांना पाठवल्या यामध्ये संपूर्ण राख्या या चंदीगड येथे कर्तव्य बजावत असणाऱ्या वीर सैनिकांना पोहोचल्या असून त्यांनी त्या आपल्या हातावर बांधून लालबहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थ्यांचे आभार मानले आहेत.
जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान,तुझ्या शौर्यगाथेपुढे त्याची केवढीशी शान
इंदिरा संतांच्या या ओळी सैनिकांप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अतिशय समर्पक आहेत. स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन असा दुग्धशर्करा योग जुळून आल्यामुळे यावर्षी स्वातंत्र्यदिनी सैनिकांना राखीसोबत कृतज्ञता पत्र पाठवण्याचा उपक्रम वसमत येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाने हाती घेतला होता.
त्याप्रमाणे भारतीय सेनेत कार्यरत असणाऱ्या भारतीय वीर जवानांना राख्या पाठविण्यात आल्या होत्या.त्या राख्या चंदीगड येथे कर्तव्य बजावणाऱ्या वीर सैनिकांना पोहचल्या असून त्यांनी वसमत येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे आभार मानले आणि ही रक्षाबंधन आमच्या जीवनातील सर्वात अविस्मरणीय आहे असे त्यांनी सांगितले.