
श्रीमद्-महावाक्य निरूपण तथा बेलापूर चरित्र निरूपण सोहळा, कुरुंदा, ता वसमत, जि हिंगोली येथे होत असलेल्या सत्संग सोहळा .
द्वितीय दिवस
व्याख्याते सैगराजदादा बिडकर (सातारा)
पंचकृष्ण यांना नमन करून प्रवचनाला सुरवात करण्यात आली , नंतर सत्संगाला सुरवात झाली.यादवकालीन मराठीचा आद्यग्रंथ लीळाचरित्र यातील सामाजिक जीवनात आधारित असलेल्या लिळांचे निरूपण केले त्यात मनुष्याने विवेकबुद्धी ने आचार , वर्तन कसे करावे हे सांगितले त्याच प्रमाणे लीळाचरित्र या ग्रंथातील आद्य बालकथा ही सांगितली, त्यात बोध पर निरूपण केले की आपल्याला कावळ्या सारखे बनायचे नाही, कारण कावळा हा जिवासारखा आहे, आणि त्याच घर हे प्रपंचा सारख आहे म्हणजेच नाशिवंत आहे, अश्या प्रकारचे बोधपर लीळा कथा निरूपण केल्या, तसेच लिळेचे किती प्रकार पडतात याची पण सविस्तर माहिती दिली, सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी सांगितलेला चार साधनांचा उपदेश आज सर्व भक्त श्रोतावर्गाला अनुभवता आला ,आत्मसात करण्यात आला, तसेच मनुष्याने हिंसा करू नये अहिंसक वृत्ती असावी, एकंदरीत मनुष्याने या धावपळीच्या जीवनात कसा व्यवहार करावा याचे मार्गदर्शन करण्यात आले व सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींच्या जयघोषात आजच्या सत्संगाची सांगता झाली.
कार्यक्रम संयोजक – म .जायराजबाब कपाटे सदभावना फाउंडेशन