
श्रीमद्-महावाक्य निरूपण तथा बेलापूर चरित्र निरूपण सोहळा, कुरुंदा, ता वसमत, जि हिंगोली येथे होत असलेल्या सत्संग सोहळा .
प्रथम दिवस
व्याख्याते सैंगराजदादा बिडकर (सातारा)
पंचकृष्ण यांना नमन करून प्रवचनाला सुरवात करण्यात आली. नंतर सत्संगाला सुरवात झाली.
प्रथम सत्संगाची पार्श्वभूमी सांगितली व मनुष्य हा शेवट पर्यंत विद्यार्थी असतो असे निरूपण केले. तसेच संतांच्या ज्ञानियांच्या सहवासात गेल्यावर मनुष्याच्या जीवनात जो बदल होतो त्याचे विवेचन केले. सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे विचार तत्वज्ञान हे सामान्य मनुष्याच्या जवळ पोहचवण्याचे कार्य ज्ञानी विभूतींनी बहुसंख्ये ने केले व ज्ञानाचा दीप तेवत ठेवला आणि ठेवत आहे.मराठीचा आद्य ग्रंथ लीळाचरित्र, श्री गोविंद प्रभू चरित्र
, श्री कृष्ण चरित्र व स्मृतिस्थळ या वाङ्मयाने साहित्याची उभारणी करून अविरत पणे मराठी साहित्याला जिवंत ठेवले.तसेच यादवकालीन महाराष्ट्र व त्याच्या सीमा याची माहिती दिली. व परभणी जिल्ह्याने महानुभाव पंथाला दिलेले योगदान याचे त्यांनी विस्तृत पणे विवेचन केले. लीळाचरित्र यातील लीळा हा शब्द कसा व्यापक आहे याची महती निरूपण केली, व पंडित म्हाईमभट्ट यांनी लीळाचरित्र याचे संकलन कसे केले हा इतिहास सांगितला. तसेच , ईश्वराचे स्मरण कसे करावे यावर विवेचन केले, त्या नंतर बेलापूर येथील स्थानाची महती थोडक्यात सांगून आजच्या निरूपणाचा समारोप झाला.
कार्यक्रम संयोजक – सद्भावना फाउंडेशन