ताज्या घडामोडी

सुभाष भास्कळ यांना राज्यस्तरीय क्रांतिबा जोतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

रामु चव्हाण

बीड : रामु चव्हाण

   बीड जिल्हा मुप्टा संघटना आयोजित सन – २०२२ चा क्रांतिबा जोतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सिरसमार्ग केंद्रातील जि. प . प्रा . शा . माणकापूर येथे कार्यरत असलेले ज्ञानी , गुणी , सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व श्री सुभाष भास्कळ यांना जाहीर झाला आहे .

सरांचे काही विद्यार्थी नवोदय पात्र तसेच अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत . सरांच्या शाळेत जास्त करून अनुसुचित जमातीची मुले शिक्षण घेतात . अनेक मुले आज प्रशासकीय सेवेत सेवा बजावत आहेत . सरांना एक आवडीचा छंद आहे तो म्हणजे प्रत्येक राष्ट्रीय सण जयंत्या पुण्यतिथ्या ला शाळेत मुलांच्या स्पर्धा घेवून त्यांना स्वखर्चातून बक्षिसे वाटणे होय .
सरांनी मुलांना इंग्रजी व इतर विषयाची गोडी लागावी म्हणून 17800 रुपये स्वखर्चातून शाळेच्या कंपाउंडवर पेंटींग करून घेतली आहे .
शाळा तंबाखू मुक्त पुरस्कार ,
आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त , असून सरांना याआधी

शारदा प्रतिष्ठान गेवराई ,

रोटरी क्लब ऑफ बीडचा राष्ट्राशिल्पकार पुरस्कार ,

ग्रुप ग्रांमपंचायत खडकी तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार ,
प्रदान झालेले आहेत .
सन २००४ सालचे तत्कालीन आयुक्त व्ही . रमणी यांचा
सर्वांगिण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम याअभियान उपक्रमा अंतर्गत उत्कृष्ट शैक्षणिक कार्य केल्याबददल सरांना आगाऊ वेतनवाढ सुद्धा प्राप्त आहे .
सरांना लिखानाची प्रचंड आवड आहे .
त्यांनी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सत्य परिस्थिती असलेल्या स्त्रीभ्रूण हत्येवर ‘ लेक वाचवा देश वाचवा ‘ हे नाटक लिहिले ,
व या नाटकाचे गणेशोत्सव काळात गावोगावी अनेक प्रयोग करून ‘ मुलगाचं ‘ जन्मास येण्यास स्त्री जबाबदार नसून पुरुषचं जबाबदार आहे हे वैज्ञानिक दृष्ट्या पटवून दिले . हे नाटक त्याकाळात प्रचंड गाजले त्याचा साक्षीदार माझ्यासह सरांनी घडवलेले अनेक कलाकार आहेत .
सरांचे शाळेवर उत्कृष्ट कार्य तर आहेच शिवाय सामाजिक कार्यही अतिउत्कृष्ट आहे . नुकत्याच गेलेल्या कोरोना लाटेत सरांनी त्यांच्या शाळेच्या गावातील अख्या लोकांना कोरोना होवू नये म्हणून घरोघरी मास्क वाटप केले होते .
अशा या गुणी व्यक्तिमत्वाला राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरविण्यात येणार असल्यामुळे सर्वच स्तरातून सरांचे कौतुक होत आहे . सरांचे पुनश्च एकदा मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा .वसमतकरांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व शुभेच्छासर

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!