कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक सुरू झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काही उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत यांनी घेतला होता.
याबाबत सोनटक्के एकनाथ बाबुराव राहणार भेंडेगाव व प्रदीप सारंग यांचा अर्ज जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे बाद केले होता. त्या निर्णयानंतर दोन्हीही उमेदवारांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली यांच्याकडे दाद मागण्यासाठी अपील दाखल केलेली होती.
वसमत तालुक्यातील मोठे शक्तीस्थान म्हणजे वसमतची कृषी उत्पन्न बाजार समिती होय या निवडणूकीत तालुक्यातील सर्वच नेत्यांचे विशेष लक्ष असते सध्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी साठी अर्ज भरणे व छाननी प्रकिया नुकतीच पुर्ण झाली आहे. भेंडेगाव येथील बाबुराव एकनाथराव सोनटक्के भेंडेगावकर व
हयातनगर येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पंडीतराव सारंग यांचे चिरंजीव व राष्ट्रवादीचा ओबीसी युवा चेहरा प्रदीप सारंग यांनी वसमत बाजार समिती निवडणुकीत सोसायटी मतदार संघातुन ओबीसी प्रवर्गात निवडणुक अर्ज भरला होता. पण अर्ज भरतेवेळी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र दाखल केलेली पोहच पावतीची सत्यप्रत सोबत जोडली होती पण वसमत बाजार समिती निवडणुक अधिकारी यांनी त्यांचा ओबीसी प्रवर्गाचा अर्ज जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे तो अर्ज बाद केला होता पण त्यांनी या निर्णयाला जिल्हा निवडणूक अधिकारी कृ.उ.बा.स.तथा जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था हिंगोली यांच्याकडे अपिल केले व या प्रकरणाची सुनावणी होऊन त्यात ते दोन्ही अर्ज त्यांचा ओबीसी प्रवर्गाचा वैध ठरविण्याचा आदेश 5/12/2022 रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी काढला व त्या आदेशाची प्रत संबंधित निवडणूक अधिकारी व अपिलार्थी यांना मिळाल्यामुळे ओबीसी प्रवर्गात मोठा आनंद निर्माण झाला आहे व अनेकांनी या निर्णयाचे स्वागत करुन आनंद व्यक्त केला आहे.