वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक उमेदवारी अर्ज परत घेण्याची 9 डिसेंबर हा शेवटचा दिनांक असून आज दिनांक 8 डिसेंबर रोजी निवडणुकीतून चार उमेदवारांनी माघार घेतल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आसाराम गुसिंगे,ज्ञानदेव डुकरे,दुधमल
यानी सांगितले.
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर विविध मतदारसंघातून 18 जागेसाठी 116 अर्ज भरल्या गेले होते. उमेदवारी अर्ज वापस घेण्याची उद्या 9 डिसेंबर शेवटचा दिनांक असून त्याआधी आज दिनांक 8 डिसेंबर रोजी 4 उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतले.
शशीकुमार गंगाधर कुल्थे
कैलास शिवप्रसाद काबरा
शिवकाशी संभाजीराव सोनटक्के
विलास शंकरराव नादरे
या चौघांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.