मंगळवारी लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील छोट्या वैज्ञानिकांनी भरवले विज्ञान प्रदर्शन आणि पटवून दिले विज्ञानाचे महत्व… नेहमीच आपल्या वैविध्य पुर्ण उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करणारी लाल बहादूर शास्त्री विद्यालय ही शाळा आज छोट्या छोट्या वैज्ञानिकांसोबत विज्ञान दिन साजरा करून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना चालना दिली.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री. बालाजी चव्हाण सर हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अनिकेत बोखारे (ph.D. Physics Research Scholar, Govt. Vidarbh Institute of Science and Humanities, Amravati ) व श्री. रामेश्वर बनकर {Ass.Professor (physics ) Mahatma Fule Arts, Commerce and Sitaramji Chaudhari Science College Warud, Dist. Amravati. Member of LIGO Scientific Collaboration, USA.} हे उपस्थित होते.श्री. रामेश्वर बनकर सर यांनी खगोलशास्त्रा विषयी माहिती देताना सूर्यमालेतील ग्रह, तारे त्यांचा जन्म मृत्यु व आकाशगंगा याची चित्रफिती द्वारे सविस्तर माहिती दिली.
तसेच प्रा. अनिकेत बोखारे सर यांनीLIGO प्रकल्प त्याचे उद्देश, भविष्यातील शोध याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांसमोर सादर केली. जवळपास ८० प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यामध्ये त्यांनी मानवी शरीर रचना, सेंद्रिय शेती, सौरऊर्जेवर आधारित प्रयोग, ज्वालामुखी,प्रदूषण, उर्ध्वपतन, जलचक्र, अंकुरण, अँसिड रेन, ट्रँफिक लाईट, ठिबक सिंचन, सूर्यमाला, नैसर्गिक आपत्ती, पवनचक्की, JCB, पचनसंस्था, सँनिटियझर मशीन, भुकंप, कोरोना व्हायरस व घ्यावयाची काळजी असे अनेक विषय विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगाद्वारे सादर केले. या बाल वैज्ञानिकांना सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रकाश कांबळे सर यांनी केले.श्री.श्रवण कदम सर यांनी विज्ञान दिनानिमित्त मार्गदर्शन पर भाषण केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे अध्यक्ष श्री.संदिप चव्हाण सर,इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ.अनुराधा चव्हाण मँडम, सेमी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा गोंगे मँडम, गोविंद गडगिळे सर, गायकवाड सर, संतोष छपरे सर, विनायक बारिकी सर, कुणाल बोबडे सर, रमेश आझादे सर,विष्णूवर्धन गौंड सर, शेख समिर सर, सचिन लाटकर सर,शेख रियाज सर,कल्याण ढगे सर, कालिदास कौसडिकर सर,राजकुमार निरजापाटिल सर,प्रमोद डोंबे सर, श्रवन कदम सर, प्रकाश कांबळे सर, संभाजी देशमाने सर, सतिश चव्हाण सर, मिरा खराटे मँडम, सोनाली अग्रवाल मँडम, नेहा शातलवार मँडम, वैशाली मोगेकर मॅडम,सरिता अग्रवाल मॅडम, अरूणा मुंजाळ मँडम, दुर्गाताई ढेपे मँडम,अंकिता हरबयासी मँडम, सुचिता कान्हे मँडम, मेघारानी चंदेल मँडम, गंगासागर पवार मँडम, शामा गरूडकर मँडम, लता खांडेगांवकर मँडम, भाग्यश्री काटे मँडम आदिंनी सहकार्य केले.