उन्हाचा पारा वाढल्याने कागबन येथील पोहायला गेलेल्या वय अंदाजे पंधरा वर्ष शुभम महाजन यांचा आज कॅनल मध्ये बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
मौजे कागबन येथील पांडुरंग महाजन यांचा मुलगा शिवम वय अंदाजे पंधरा वर्ष हा आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कागबन येथील कॅनॉल मध्ये पोहण्यासाठी गेला असता पाण्यामध्ये उडी घेतल्यानंतर तो पाण्यात बुडाला व त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली यावेळी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शुभम याचा मृतदेह पाण्यातून काढल्यानंतर त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आल्याची माहिती आहे
याबाबत हे वृत्त लिहीपर्यंत ग्रामीण पोलीस स्टेशन येथे संपर्क साधला असता ग्रामीण पोलिस ठाण्यात कुठल्याही घटनेची नोंद झाली नसल्याचे माहिती स. पोलीस निरीक्षक यांनी दिली .यामुळे एका पंधरा वर्ष मुलाचा दुःखद निधनामुळे सर्व कागबन गावावर शोककळा पसरली आहे.